Type Here to Get Search Results !

खडी क्रशर बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणार-डॉ. नंदाताई बाभुळकर

गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी येथील खडी क्रशर बाधित शेतकरी कुटुंबीयांची डॉ.नंदा बाभुळकर यांनी भेट घेतली.क्रशरच्या ब्लास्टिंगमुळे घरांच्या भिंतीना पडलेले तडे, आटलेले पाण्याचे स्त्रोत, क्रशर मधून निघणाऱ्या धुळीमुळे जनावरांच्या चाऱ्याचे होत असलेले नुकसान आदी बाबींची माहिती घेत खडी क्रशर परिसरातील वसाहती व शेतीची पाहणी केली.


यावेळी सर्व शेतकऱ्यांनी डॉ. बाभुळकर यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या.गेल्या बारा वर्षापासून या परिसरात सातत्याने खडी क्रशरमुळे उध्वस्त झालेली शेती, मानवी व पशूंच्या जीवनमानावर  झालेले दुष्परिणाम फारच गंभीर असून या प्रश्नी लढा देणाऱ्या या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून त्यांना न्याय मिळेपर्यंत आपण मागे हटणार नाही असा शब्द डॉ. बाभुळकर यांनी शेतकऱ्यांना दिला.तसेच हा प्रश्न पर्यावरणाशी निगडित असून लवकरच आपण शेतकरी, क्रशर मालक व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठकीची मागणी करणार असल्याचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या डॉ. नंदाताई बाभुळकर- कुपेकर यांनी सांगितले.यावेळी आंदोलनाचे प्रमुख नेते राजगोंडा पाटील व शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments