Type Here to Get Search Results !

कै.केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ उत्साहात!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कै.केदारी रेडेकर आयुर्वेदीक महाविद्यालय पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन केंद्र, गडहिंग्लज येथील महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर व काँग्रेस नेते बंटी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोल्हापूरात पार पडला. 


या आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना बंटी पाटील म्हणाले कि,डॉक्टर पेशा सर्वात प्रतिष्ठित मानला जातो. प्रत्येक पेशामध्ये सातत्याने अपडेट राहणे, नवनवीन तंत्रज्ञान शिकत राहणे ही आता काळाची गरज बनली आहे. या गोष्टी तुम्ही आत्मसात करून आपले भविष्य उज्वल करा, असा सल्ला देताना आयुर्वेदिक, आयुष आणि युनानी शास्त्राकडे सरकारने लक्ष देऊन याला प्रोत्साहित केले पाहीजे असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. 


यावेळी कै. केदारी रेडेकर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा आणि गोकुळ संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सेक्रेटरी अनिरुद्ध रेडेकर,जेपीईएस मेडीकल कॉलेजचे डीन डॉ. राजकुमार पाटील, महाराष्ट्र आरोग्य शिक्षण मंडळाचे सदस्य़  डॉ. मिलिंद गोडबोले, गोकुळचे संचालक बयाजी शेळके यांच्यासह हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे सक्रेटरी बबनराव पाटील, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी चिमणभाऊ डांगे, श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे जयंत पाटील, जे.जे. मगदूम ट्रस्टचे विश्वस्त विजय मगदूम, श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे प्रदीप पाटील, अजिंक्य चव्हाण, डॉ. विराज शुक्ला, डॉ. अमित चिंगळे, डॉ. पंकज विश्वकर्मा, डॉ. शिवानी गावंडे, डॉ. विजय रुद्रप्पागोळ, डॉ. नयना विश्वकर्मा, डॉ. सोनाली शुक्ला, डॉ. अमोल जाधव यांच्यासह वैद्यकिय शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments