चंदगड/प्रतिनिधी : जांबरे येथील ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिराचा वास्तुशांती व जीर्णोध्दार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.समस्त भाविक, दानशूर व्यक्ती व जांबरे ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून साकारलेल्या श्री.देव रवळनाथ मंदिराची वास्तुशांती व जीर्णोधार सोहळा विविध धार्मिक विधीने साजरा करण्यात आला असून दि.2 ते 5 मे या कालावधीत मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली होती.
यावेळी भाजपा नेते संग्रामसिंह कुपेकर,उद्योजक लक्ष्मण गावडे,सुनील काणेकर,सुरेश सातवणेकर,मधुकर देसाई,रविंद्र गावडे पोलिस पाटील, चंद्रकांत गावडे, भागोजी गावडे, विजय गावडे,विष्णु गावडे,शरद गावडे यांच्यासह जीर्णोद्धार कमिटी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments