नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : पोळगाव ता.आजरा येथे श्री.साईनाथ कला,क्रीडा व सार्वजनिक मित्र मंडळ यांच्यावतीने गुरुवार दिनांक 22 मे रोजी सायंकाळी चार वाजलेपासून खुल्या संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम पाच क्रमांकाना आकर्षक बक्षिसे,सन्मानपत्र व ट्रॉफी देण्यात येणार असून उत्कृष्ट गायक,हार्मोनियम , तबलावादक यांनाही आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून इच्छुक भजनी मंडळानी 9224263519,9730499538,9505830121,9004858719 या मो. नं.वर संपर्क साधावा असे मंडळाकडून आवाहन करण्यात आले आहे.
22 मे ला सकाळी साई बाबा मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार असून यानंतर मुर्तीपुजन , सत्यनारायण महापूजा होणार असून केंचेवाडी येथील परशुराम निंबाळकर व सहकारी तर फाटकवाडी येथील युवराज फाटक यांचे भजन व दुपारी हांदेवाडी येथील श्री ब्रम्हदेव महिला मंडळ यांचा हरिपाठ होणार असून साई भक्तांनी याचा लाभ घ्यावा.तर सायंकाळी चार नंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
Post a Comment
0 Comments