आजरा प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : मडीलगे ता.आजरा येथील सुशांत सुरेश गुरव वय-35 वर्षे याने कर्जबाजारीमुळे टोकाचा निर्णय घेत आपल्या पत्नीला संपविले.त्याने स्थानिक ठिकाणी बऱ्याच लोकांकडून व बँकेकडून कर्ज घेतले होते.कर्ज भागविण्यासाठी पत्नी पूजाकडे तो सोन्याचे दागिने गहाण ठेवून लोकांचे पैसे व बँकेचे कर्ज भागवूया व आपल्याला झालेल्या सोरायसिस आजारावर उपचार करूया,अशा वादातून या दोघात 18 मे 25 रोजी मध्यरात्री पावणे तीन च्या सुमारास वादावादी झाली.
यावेळी पत्नी पूजा गुरव म्हणाली की, आजोबाचे आजारपणासाठी सोने गहाण ठेवले होते.आता मी सोने देणार नाही.तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हंटल्यावर आरोपी सुशांतने घरातील दगडाने व शेतात काम करण्याच्या छोट्या फावड्याने पत्नी पूजाच्या डोक्यात गंभीर प्रहार करत तिला जीवे ठार मारले.व स्वतः दरोड्याचा बनाव रचल्याची कबुली सुशांतने दिली.या गुन्ह्याचा अत्यंत कौशल्यपूर्व तपास करून फिर्यादी पतीच आरोपी असल्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व आजरा पोलिस ठाणे यांनी संयुक्त पद्धतीने करून 24 तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणत आरोपीस बेड्या ठोकल्या.
पत्नीच्या मृत्यूनंतर खोटा बनाव कट रचत सुशांतने फिर्याद आजरा पोलीस ठाण्यात दाखल केली.आपल्या पत्नीचे सोने चोरून तिची हत्या दरोडेखोरांनी केली असल्याचा आवं आणत सुशांत बचाव करू लागला.पण तात्काळ पोलिसांची चौकशी सुरु झाल्यानंतर सुशांतचे पितळ उघडे पडले. व फिर्यादीच आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
सदरचा गुन्हा हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज विभाग इचलकरंजी निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांचे मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर,आजरा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक नागेश यमगर व स्थानिक गुन्हे शाखेकडील स्टाफ-पोउनि, मोरे, पोउनि. गळवे, पोलीस अंमलदार समिर कांबळे, प्रकाश पाटील, सतिश जंगम, अमित सर्जे, दिपक घोरपडे, कृष्णात पिंगळे, राजु कांबळे, विशाल चौगले, संदिप बेंद्रे, विजय इंगळे, सचिन जाधव, सोमराज पाटील, रोहित मर्दाने, राजेश राठोड, सुहास कांबळे, सुशिल पाटील, हंबिरराव अतिग्रे, अनिल जाधव व स्टाफ पोउनि, संजय पाटील, पोठनि. युवराज धोंडे, कविता कदम, संदिप म्हसवेकर, साजिद शिकलगार, दयानंद बेनके, पांडुरंग येलकर, रेश्मा नाईक, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कांबळे, नितीन पाटील, अमर उबाळे, विकास कांबळे, वैभव गवळी, सुर्यकांत सुतार, संजय नवलगुंदे, महांतेश पाटील, दत्तात्रय शिंदे, प्रशांत सुतार, रामदास वाघ, प्रकाश पुजारी, विशाल आंबोळे, दिपक किल्लेदार, सुशांत सिंघन यांनी सदर खुनाचा गुन्हा उघडकिस आणला आहे.
Post a Comment
0 Comments