Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज परिमंडळातील वनपाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.


कोल्हापूर/प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील राज्य हद्द रस्ता क्र 63 च्या रस्ता रुंदीकरणाच्या कामात बाधित होणारी झाडे तोडण्यासाठी लिलाव प्रकियेद्वारे टेंडर भरलेल्या अर्जदारकडे टेंडर अर्जाची चौकशी करून पुढे वरिष्ठाकडे पाठविणे करिता 6000रु लाचेची मागणी करणाऱ्या वनपाल सागर पांडुरंग यादव वय वर्षे 43, सद्या रा.साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर तर मूळ गाव हासूर दुमाला, ता करवीर कोल्हापूर याने अर्जदाराकडून तडजोडअंती 5000 रु लाचेची रक्कम घेतल्याचे निष्पन्न झाल्याने कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  वन परिमंडळ अधिकारी गडहिंग्लज येथील वनपाल सागर यादव याला अटक करून गुन्हा नोंद केला आहे.



सदरची कारवाई कोल्हापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग उपअधीक्षक श्रीमती वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक श्रीमती आसमा मुल्ला, अजय चव्हाण, सुनील घोसाळकर, सचिन पाटील, संदीप पवार, कृष्णा पाटील, गजानन कुराडे, प्रशांत दावणे यांनी पार पाडली.

Post a Comment

0 Comments