चंदगड/प्रतिनिधी : आगामी गळीत हंगामाचे शुक्रवार दि. 9 मे रोजी अथर्व-दौलत साखर कारखान्याकडून रोलर पूजन करण्यात आले.या कार्यक्रमाला चेअरमन मानसिंग खोराटे,ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील, संग्रामसिंह कुपेकर,ॲड. संतोष मळविकर, जगन्नाथ हुलजी, संजय पाटील,गोपाळ पाटील,प्रगतशील शेतकरी संजय पाटील यांनी उपस्थिती लावली होती.
यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये बारामती कृषी विज्ञान केंद्राचे शेती अभ्यासक प्रवीण भोईटे यांनी ऊस शेतीच्या AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञान वापराबद्दल मार्गदर्शन केले.यामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर, त्याचे फायदे, तंत्रज्ञान वापरण्याची पद्धत आणि एकूणच ऊस उत्पादन वाढीसाठी आवश्यक उपकरणांची माहिती भोईटे यांनी दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्रू लाढ यांनी तर आभार दयानंद देवण यांनी केले.यावेळी शेतकरी, वाहतूकदार, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांची खरी दौलत म्हणजे तेथील दौलत कारखाना. जो शेतकऱ्यांच्या सहकार्याने व कामगारांच्या जोरावर चेअरमन मानसिंग खोराटे यांनी अल्पवाधितच केडीसी बँकेतून कर्जमुक्त केला.मानसिंग खोराटे यांनी काही वर्षांपूर्वी बंद असणारा कारखाना ताब्यात घेऊन नवसंजीवनी देत हा कारखाना मोठ्या स्वरूपात गाळप क्षमता ठेवत पुढं आणला आहे. त्यामुळे चंदगडवाशिय शेतकऱ्याकडून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जाते.
Post a Comment
0 Comments