Type Here to Get Search Results !

सुंडी येथे आरोग्य शिबिर संपन्न.

चंदगड प्रतिनिधी / रुपेश मऱ्यापगोळ : गुरुमाऊली फाउंडेशन सुंडी यांच्यावतीने सुंडी ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.चंदगड पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी जी. वाय. कांबळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त एक सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी आपल्या स्वखर्चाने हा उपक्रम राबविला. 



या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम कांबळे यांनी केले. यावेळी उपस्थित डॉक्टर व शिबिरार्थींचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.या शिबारात एकूण 70 रुग्णांची तपासणी करून औषध वाटप करण्यात आले.यावेळी पंकज खानापुरे,सरपंच मनोहर कांबळे, कृष्णा कांबळे, वेणू कांबळे, विजयमाला तराळ, अलोक कांबळे, प्रज्ञा कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक तुकाराम कांबळे यांनी तर आभार राहुल तराळ यांनी मानले.

Post a Comment

0 Comments