चंदगड : येथील सुप्रसिद्ध असणाऱ्या रायजर्स ट्रॅक फाउंडेशनच्या वतीने सुरू असणाऱ्या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराला चंदगड येथील स्टीफन इंग्लिश मीडियम स्कूलच्या क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.गेल्या आठ-दहा वर्षांपासून चंदगड येथील लक्ष्मण कीर्तीकर या अष्टपैलू खेळाडूंने रायजर्स ट्रॅक फाउंडेशन महाराष्ट्र या नावाची क्रीडा संस्था स्थापन करून खेड्यापाड्यातील गोरगरीब व होतकरू मुलांच्या खेळाच्या तंत्रशुद्ध प्रशिक्षणाला सुरुवात केलेली आहे.
या फाउंडेशन तर्फे दरवर्षी तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर असंख्य विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे, अतिशय परफेक्ट प्रशिक्षण व सातत्याने सराव हा यशाचा मूलमंत्रअसून आपल्या तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकावणे हे आपले मुख्य लक्ष असल्याचे मत मुख्य क्रीडा प्रशिक्षक लक्ष्मण कीर्तीकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.चंदगड येथील स्टीफन इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रशस्त ग्राउंड वर 2 मे ते 15 मे पर्यंत हे उन्हाळी शिबिर असणार आहे. या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सचिव महेश पाटील, संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण कीर्तीकर, प्रा.डॉ.गुंडूराव कांबळे,सामाजिक कार्यकर्ते गणेश फाटक, भोसले सर, सौ राजश्री गावडे, नितेश गावडे, जयवंत कांबळे, संतोष कालकुंद्रीकर, मोहम्मद सय्यद, नितेश गावडे,संदीप गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उन्हाळी शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Post a Comment
0 Comments