Type Here to Get Search Results !

अवैधरित्या गोवा बनावट दारू वाहतूक करणाऱ्या तिघांवर चंदगड पोलिसांची कारवाई.

चंदगड/प्रतिनिधी - गोवा बनावटीची दारू अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या बेळगाव येथील तिघांना चंदगड पोलिसांकडून अटक करण्यात आलीय.या कारवाईत सुमारे 6,82,840 रूपयांच्या मुद्देमालासहित तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. चंदगड पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार,ही कारवाई मोटणवाडी ते आंबेवाडी रोड फाट्याजवळ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक हणमंत नाईक यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.या छाप्यामध्ये गोवा बनावटीची सुमारे 57,600 रूपयांची दारु,तर या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी ग्रे रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक KA-04ME 3822 हे वाहन जप्त करण्यात आले. त्यामुळे एकुण सुमारे 6,82,840 रुपयांचा मुद्देमालावर चंदगड पोलिसांकडून कारवाई केली.


या कारवाईत वाहन चालक प्रकाश भरमगोडा पाटील वय वर्षे 45 रा.रामलिंग खिंड बेळगाव,अतिराज रामचंद्र पारधी वय वर्षे 30 रा.तानाजी गल्ली बेळगाव,सुभाष सुधीर डे वय वर्षे 47 रा. महाद्वार रोड बेळगाव अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.याविषयी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शितल धविले करत आहेत.

Post a Comment

0 Comments