चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यामध्ये पाटणे वनपरिक्षेत्रातील हाजगोळीच्या जंगल परिसरातून ट्रॅप कॅमेरा चोरीप्रकरणी गौतम सुभाष निकम (रा. तुर्केवाडी, ता. चंदगड) यास वनविभागाने अटक केली आहे.वनविभागाकडून गस्ती घालत असताना कॅमेरा चोरी झाल्याचे निष्पन्न होताच लगेच तपास सुरू करण्यात आला.यावेळी चौकशीत संशयित इसम म्हणून निकम यांना ताब्यात घेतले. व अधिक चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली.यावेळी त्याच्याकडून फोडलेला ट्रॅप कॅमेरा,माकडाच्या मांसाचा तुकडा,चार शिकारीसाठी सापळे, सांबराची पाच शिंगं, घार व लांडोर पक्ष्यांची १२ पिसं, व तीन लोखंडी बाण जप्त करण्यात आले.याविषयीची सविस्तर कारवाई वनरक्षक हाजगोळी यांच्या तक्रारीनंतर करण्यात आली असून सदर इसमाविषयी गुन्हा नोंद करत आरोपीस चंदगड न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास उपवनसंरक्षक कोल्हापूर जी. गुरुप्रसाद व सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे, वनपाल बाळासाहेब भांडकोळी, वनरक्षक मेघराज हुल्ले, प्रकाश मारुती शिंदे, सचिन अडसुळ, श्रेयश रायके, खंडु कातखडे, पांडुरंग कुलाळ, खंडु कोरे, अमित माने, पास्कल डिसोजा व वाहन चालक विश्वनाथ नार्वेकर व शुभम बांदेकर व वन्यजीव बचाव पथक करीत आहे.
Post a Comment
0 Comments