Type Here to Get Search Results !

विंझणे येथे आरोग्य शिबिर संपन्न.


चंदगड/प्रतिनिधी : विंझणे ता.चंदगड येथे जे.डी.आर.हॉस्पीटल ज्योतिर्लिंग धर्मादाय रुग्णालय नेसरी यांच्यामार्फत आरोग्य शिबिर पार पडले.यावेळी गावातील लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आरोग्य तपासणी करून घेतली.तर रुग्णांना रुग्णालयाकडून मोफत तपासणी करत औषधे देण्यात आली.


या आयोजित शिबिरामध्ये सरपंच तानाजी पवार यांनी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी यांचे आभार मानून त्यांना शुभेच्छा दिल्या. तर उपसरपंच शामराव बागवे,ग्रा.सदस्य  शिवाजी पवार,दीपाली जेगृतकर,हरी जाधव,लता खबरे, शोभा इंगवले,धनश्री कांबळे, तुकाराम शेंडे,पुंडलीक पाटील यांच्यासह गावातील नागरिक हजर होते.यावेळी ग्रामस्थांनी ज्योतिर्लिंग धर्मादाय रुग्णालयाचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments