गडहिंग्लज/प्रतिनिधी : गडहिंग्लज तालुक्यातील मुंगुरवाडी येथे माजी आमदार राजेश पाटील यांच्या विकास निधी व विशेष प्रयत्नातून ओढ्यावरील छोटा पूल 1.50 कोटी,अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण 10 लाख,मुख्य चौक ते कर्नाटक राज्य हद्दीपर्यंत रस्ता डांबरीकरण 80 लाख अशा विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी माजी आमदार राजेश पाटील,संग्रामसिंह कुपेकर,दिपकदादा जाधव,अभय देसाई अडकूरकर,तानाजीराव पाटील, मुन्नासो नाईकवाडी,एन डी कांबळे,अमर हिड्डदुगी, शिवराज देसाई, संदीप शिंदे, रोहिदास चौगुले,डे सरपंच पुंडलिक कोष्टी, अशोक पाटील, पी डी पाटील, मुंबई मंडळ अध्यक्ष संजय इंचनाळे, तुकाराम होडगे, दिनकर मेटकर, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments