चंदगड/प्रतिनिधी : देवरवाडी ता.चंदगड येथील प्रा.नागेंद्र कृष्णा जाधव यांनी मुंबई विद्यापीठाची एल.एल. बी कायद्याची पदवी 59.43 % गुणांनी उत्तीर्ण केली.सावंतवाडी येथील श्री.पंचम खेमराज विधी महाविद्यालयातून त्यांनी ही पदवी प्राप्त केली आहे.त्यांचा हलकर्णी ता चंदगड महाविद्यालयातील नोकरीचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबीत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वयाच्या 47 व्या वर्षी वकिलीची पदवी मिळविल्याने देवरवाडी ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करून त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
प्रा नागेंद्र जाधव यांनी न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशन नवी दिल्ली, प्रदेशाध्यक्ष, जन ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर कार्याध्यक्ष,दर्शन पोलीस टाइम वृतपत्राचे विशेष प्रतिनिधी,कोकण विभाग आणि विद्याश्री बुक सेंटर, पाटणे फाटा,संयोजक या विविध जबाबदाऱ्या सांभाळत हे कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे.अनेक संकटावर मात करत त्यांनी या वकिलीच्या परीक्षेत यश मिळवल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
Post a Comment
0 Comments