Type Here to Get Search Results !

प्राचार्य आनंद आपटेकर यांचा ठाण्यात सत्कार.



मुंबई/प्रतिनिधी 
: उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सीमाभागातील वैद्यकीय सेवेबद्दल वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर यांना कृतज्ञता प्रत देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी मंगेश चिवटे म्हणाले की, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व समिती नेते रमाकांत कोंडुसकर सहायता निधीतून मदत मिळण्यास सुरुवात झाली. तसेच, आगामी काळात अजून चांगल्या रीतीने सीमाभागात वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे आपण चांगले प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली. यावेळी ठाणे येथील आनंद आश्रम कार्यालयाचे विलास कळण, डॉ. बापूसाहेब अडसूळ,पोलीस आदी उपस्थित होते.


प्रा. आपटेकर यांनी सीमाभागातील रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहायता निधीचा चांगल्या प्रकारे लाभ होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात असून, रुग्णांनी अर्ज दाखल केल्यानंतर मदत मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.तीने सीमाभागात वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे आपण चांगले प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली. यावेळी ठाणे येथील आनंद आश्रम कार्यालयाचे विलास कळण, डॉ. बापूसाहेब अडसूळ, पोलीस लक्ष्मण गावडेसह आदी मान्यवर उपस्थित होते.


प्रा. आपटेकर यांनी सीमाभागातील रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहायता निधीचा चांगल्या प्रकारे लाभ होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात असून, रुग्णांनी अर्ज दाखल केल्यानंतर मदत मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments