Type Here to Get Search Results !

सत्यमेव सेवा फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप!

कल्याण/प्रतिनिधी :  रविवारी (15 जून) रोजी जगभरात फादर्स डे साजरा करण्यात आला. या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या वडिलांच्या प्रति आदर, प्रेम व्यक्त करुण संपूर्ण देशासह जगभरात 'फादर्स डे' साजरा करण्यात आला. दरम्यान, सत्यमेव सेवा फाउंडेशन शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात अत्यंत मोलाची मदत गरवंताना नेहमीच करत आहे. दुसरीकडे 'फादर्स डे'चे औचित्य साधून सत्यमेव सेवा फाउंडेशनने १ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत कल्याणमधील चिंचपाडा येथे मोठ्या उत्साहात 'फादर्स डे' साजरा केला. 


दरम्यान, यावेळी या हटके आणि दिमाखदार कार्यक्रमाला सत्यमेव सेवा फाउंडेशनचे पदाधिकारी व कल्याण परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठीत नागरिकांनी उपस्थिती लावली होती. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक सुनील बोरनाक, अध्यक्ष संदीप मेंगाणे, कार्याध्यक्ष सतीश पाटील, प्रदेश प्रवक्ते अक्षय भोसले, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना राज्य सचिव अमोल भिसे,ज्ञानेश्वरकाका तरे,संतोष खामकर, शिवसेना विभाग प्रमुख,विजय काटकर, शाहूवाडी तालुका अध्यक्ष दत्ता मोरे,आनंद कांबळे यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पाहार घालून आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.तसेच गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, समाजात अनेक संस्था कार्यरत आहेत. परंतू सत्यमेव सेवा फाउंडेशनसारखी निःस्वार्थ सेवा करणाऱ्या संस्था असतील तर देशातील शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील दरी नक्कीच कमी होण्यास मदत होईल, असं प्रांजळ मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं.

Post a Comment

0 Comments