चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितिचे राज्य संघटक व मराठी विद्या मंदिर मौजे शिरगावचे मुख्याध्यापक ईश्वर महादेव पाटील यांचा सेवानिवृत्ती समारंभ निमित्त सपत्नीक गौरव सोहळा उद्या २१ जून रोजी सकाळी ठीक १० वाजता संजय गांधी विद्यालय नागनवाडी येथे आयोजित केला आहे.
या गौरव सोहळ्याचे अध्यक्षस्थान शिक्षक समितीचे राज्य नेते शंकरराव मनवाडकर हे भूषवणार असून पाटील दाम्पत्यांचा सत्कार चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील व माजी आमदार राजेश पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे.या गौरव सोहळ्यासाठी शैक्षणिक, सामाजिक, व राजकीय क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार असून या गौरव सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे ग्रामीणचे सरचिटणीस सुधाकर पाटील,व अथर्व ई.केन अकाउंट हणमंत पाटील यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments