Type Here to Get Search Results !

सुधाताई सुतार यांच्या कुटुंबाला समाजसेवक नरसु शिंदे यांच्याकडून मदतीचा हात!

नेसरी/प्रतिनिधी : नागरदळे ता.चंदगड येथील सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका सुधाताई महादेव सुतार यांच्या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंची मदत समाजसेवक नरसू शिंदे यांनी केली.ज्याला नाही आधार,त्यांना नरसू शिंदे यांचा आधार असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.कारण या सेविकांची आर्थिक स्थिती म्हणावी तशी नाही.घर ही बसण्या उठण्यापूर्तेच आहे.त्यात पतींचे आजारपण.अशी हतबल परिस्थिती निदर्शनास येताच समाजसेवक नरसू शिंदे यांनी आपल्या परीने होईल ती मदत करून त्यांना हातभार लावला.


सुतारताई सेवानिवृत्त झालेनंतर काही रक्कम मिळाली.त्यातूनच त्यांनी पतींच्या आजारपणावर उपचारासाठी व घरचा खर्च चालविणे त्यांना जिकिरीचे होवून बसले आहे.एकीकडे महाराष्ट्र प्रगतीपथावर असताना एकीकडे अशा कुटुंबात कोणीही कमावते नसलेने अशी असंख्य कुटुंबे परीस्थितिसमोर हतबल झाली आहेत.एकंदरीत तालुक्यातील लोक प्रतिनिधींनी याकडे लक्ष घालावे व शासनाकडून होईल ती मदत त्यांना करावी व दानशूर लोकांनी अशा कुटुंबांना मदत करावी असे आवाहन समाजसेवक नरसू शिंदे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments