गडहिंग्लज प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : गडहिंग्लज शहरातील अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या नव्या शैक्षणिक संकुलाचा शुक्रवार दिनांक २० जून रोजी सायंकाळी ४ वाजता लिंगनूर माळ येथील अभिनव कॅम्पस येथे होणार आहे. या नव्या संकुलाचे उद्घाटन लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा गडचिरोली येथील प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे व डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे यांच्या शुभहस्ते तर या समारंभाचे अध्यक्षस्थान सिद्ध संस्थानमठ निडसोशीचे डॉ. शिवलिंगेश्वर महास्वामीजी भूषविणार आहेत.
अभिनव ग्रुपचे डॉ. अमोल आनंदा पाटील यांच्या पुढाकारातून उभे राहिलेल्या अत्याधुनिक संकुलात विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रात 'अभिनव' ने अल्पावधीतच गरुडभरारी मारली असून या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून अधिक व्यापक शैक्षणिक सेवा दिल्या जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षण प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन 'अभिनव' परिवाराने केले आहे.
Post a Comment
0 Comments