Type Here to Get Search Results !

शैक्षणिक उपक्रम राबवत संपादक ज्ञानेश्वर पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा!

चंदगड/प्रतिनिधी : महाराष्ट्र माझा २४ लाईव्हचे संपादक ज्ञानेश्वर पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकारी संपादिका सोनिया पाटील व उप संपादक भरमू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारबांधवानीं शैक्षणिक उपक्रम राबवित एक नवा आदर्श घालवून दिला आहे.


गडहिंग्लज तालुक्यातील विद्या मंदिर तारेवाडी व चंदगड तालुक्यातील मजरे कार्वे येथील विद्यार्थ्यांना शालेयपयोगी शैक्षणिक वस्तू वाटप करण्यात आले.यावेळी तारेवाडीच्या सरपंच विश्रांती नाईक,उपसरपंच प्रशांत तुरटे,पत्रकार रोहित धुपदाळे,रुपेश मऱ्यापगोळ,संजय धनके,माजी उपसरपंच युवराज पाटील,माजी सरपंच शिवाजी गुरव,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष बबन पाटील,उपाध्यक्ष भरत तूपूरवाडकर,शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील,सहाय्यक शिक्षक गुडुळकर,ग्रामपंचायत सदस्य भारती पाळेकर,सावित्री तुपूरवाडकर,जयराम तुपूरवाडकर,संभाजी पाटील,निलेश देसाई,खंडू तुपूरवाडकर,संपदा धनके,रेखा पाटील,लता परीट यांच्यासह पालक वर्ग उपस्थित होता.


व्यक्तीविशेष :- कोल्हापुरातील अत्यंत संयमी,बेधडक रोखठोक व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणारे व राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कृत पत्रकार ज्ञानेश्वर पाटील यांनी पत्रकारितेमध्ये उत्तम कार्य करत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.ज्ञानेश्वर पाटील यांनी पदवीधर व पत्रकारिता शिक्षण घेऊन वयाच्या 21व्या वर्षी पत्रकार म्हणून पत्रकारितेमध्ये वाटचाल सुरू केली.आपल्या लेखणीने व डिजिटल मीडियातून अनेक सामाजिक विषय प्रशासनासमोर मांडून आपल्या कार्याची पोचपावती दिली.


वृत्तपत्र व डिजिटल मीडियाच्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील विषयांना हात घालत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.चंदगड,आजरा,गडहिंग्लज,कोल्हापूर,पुणे तसेच अनेक ठिकाणच्या अचूक व ज्वलंत बातम्या देत त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडल्या.तसेच सामाजिक,अन्यायग्रस्त,प्रशासकीय विषय हाताशी घेऊन लोकांसमोर बेधडकपणे मांडल्या.एकंदरीत पाटील यांनी 11 वर्ष आपली पत्रकारितेमध्ये वेगळी छाप टाकत नवोदित पत्रकारांना पुढं आणलं आहे.सध्या ते महाराष्ट्र माझा 24 लाईव्ह या न्युज चॅनेलची संपादक पदाची धुरा सांभाळत आहेत.

Post a Comment

0 Comments