चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : जनावरे चरावयास नेलेल्या युवकावर अस्वल व त्याच्या पिल्लाने हल्ला करून युवकाला गंभीर जखमी केल्याची घटना जेलुगडे येथे घडली.दीपक पांडुरंग नार्वेकर (वय 39) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.त्याच्या डोक्यावर अनेक ठिकाणी अस्वलाची नखे लागली आहेत.दीपक हा नेहमीप्रमाणे गावाजवळ असलेल्या शेतात दुपारी जनावरे चरावयास नेला होता.यावेळी अस्वल व त्याच्या पिल्लाने अचानकपणे बेसावध असलेल्या दीपकवर हल्ला केला.अस्वल व दीपकच्या झटापटीत दोन्ही अस्वलांची नखे चेहऱ्यावर व डोक्यात लागल्याने तो रक्तबंबाळ झाला.
या घटनेची माहिती मिळताच वनपाल नेताजी धामणकर,वनरक्षक खंडू कोरे, वनसेवक शुभम बांदेकर,तुकाराम गुरव आदींनी घटनास्थळी धाव घेऊन लागलीच गडहिंग्लज येथील खाजगी दवाखान्यात हलविले.यावेळी पाटणे वन विभागाच्या वनक्षेत्रपाल शीतल पाटील यांनी दीपक नार्वेकर यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या जीवितास धोका नसल्याची माहिती दिली.तर शेतकऱ्यांनी जंगलाशेजारी शेतात जात असताना खबरदारी घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
Post a Comment
0 Comments