मुंबई प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : बदलापूर येथील सुप्रसिद्ध योग प्रशिक्षक अबीदा लमतुरे यांना आयुष्य इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, ए जी एम ए, व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट ) डॉक्टर सेल आयुष विभागाच्या वतीने अतिशय प्रतिष्ठेचा योगरत्न पुरस्कार मोठ्या थाटात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह छत्रपती संभाजीनगर येथे देण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील योग शिक्षक व योग थेरपिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांमध्ये शिक्षण सम्राट समजल्या जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ.बाळासाहेब पवार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून उपस्थित होते.सोबत पाहुण्यांमध्ये उद्योजक मनोज दांडगे,डॉ.नितीनराजे पाटील आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व्हाईस चेअरमन,डॉ.सतीश कराळे चेअरमन आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन,डॉ,बाबुराव कानडे अध्यक्ष-आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन,दिशा चव्हाण,प्रशांत सावंत, प्रा.कुणाल महाजन,मनोहर कानडे व इतर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
योगदान :-
अबीदा लमतुरे यांना मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.अबीदा लमतुरे या ठाणे येथील श्री.अंबिका योग कुटीर येथे योग शिक्षिका म्हणून काम पाहत आहेत.मागील 30 वर्षापासून त्या योगाचा प्रचार व प्रसार करत आहेत.बारा वर्षे मुंबई पोलीस व पाच वर्षे मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना तसेच केईएम स्टाफला योग प्रशिक्षण देऊन रोगमुक्त व तणावमुक्त केले आहे.या कार्याची दखल घेऊन त्यांना अंबिका योग कुटिर मार्फत सेवा पुरस्कार व व्रतस्थ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.तसेच त्यांनी इचलकरंजीतील योगा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.
दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त त्या विविध शाळेतील मुलांसाठी योगाचे धडे देतात. बदलापूर येथे त्यांच्या स्वतःचे 'मातोश्री निसर्गोपचार व योग केंद्र' असून तेथे ॲक्युप्रेशर,नॅचरोपॅथी, ॲक्युपंक्चर,सुजोक व योगाद्वारे अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत.श्रीमती अबीदा लमतुरे या गडहिंग्लज येथील सेवानिवृत्त पोलीस कै. करीम पटेल यांच्या कन्या असून त्यांचे सासर उत्तुर (तालुका आजरा)येथील आहे.गेली 40 वर्षे त्या बदलापूर (जि. ठाणे)येथे राहतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
Post a Comment
0 Comments