(ब्रेक फेल झाल्यामुळे कंटेनर टेम्पो 100 फूट दरीत कोसळून दोघे जखमी)
चंदगड/प्रतिनिधी : तिलारी घाटात ब्रेक फेल झाल्यामुळे आयशर टेम्पो 100 फूट खोल दरीत कोसळला असून या टेम्पोचा चक्काचूर झाला.सुदैवाने त्यामध्ये कोणतेही जीवितहानी झालेली नाही.या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी धाव घेवून चालक व वाहक यांना सुखरूप बाहेर काढले. यामध्ये ते दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी चंदगड ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.चालक शशीकूमार पी.रा.( परमेश्वर आप्पा 40 हाऊस नंबर 171 शिमोगा भद्रावती रोड भद्रावती) व विजय मनगुते( वय 38) रा. मयुरी टॉकीज रोड चन्नम्मा सर्कल अंकली ता.चिकोडी अशी जखमींची नावे आहेत.
चंदगड येथील प्राथमिक उपचारानंतर 'केएलई रुग्णालय बेळगाव येथे हलविण्यात आले.शशिकुमार याची प्रकृती चिंताजनक असून विजय मनगुते याचा हात मनगटातून तुटला आहे. हा अपघात जयकर पॉईंट येथे आयशर टेम्पो चे ब्रेक फेल झाल्याने घडल्याच समजते.बेळगाव कडून गोव्यात चाललेल्या या कंटेनरचे चाके,केबिन,इंजिन व हौदा असे चार तुकडे झाले असुन तिलारी घाटातून अवजड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी असून सुद्धा अशी वाहने राजरोस घाटात येऊन अपघातग्रस्त होत आहेत.पोलीस यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित होत आहे.
मागील वर्षभर याच जयकर पॉईंट नजीक संरक्षक भिंत खचल्यामुळे पूर्ण वर्षभर सर्व प्रकारची वाहतूक बंद होती.तिलारी घाट वाहतुकीसाठी धोकादायक मानला जातो.तीव्र उतार आणि धोकादायक वळण यामुळे या गटात वाहतूक जोखमीचे असते.शिवाय पावसाळ्यात हा धोका अधिक वाढतो.घाटातून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे,त्यामुळे स्थानिक लोकांना अडचणी येतात आणि घाट रस्त्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
Post a Comment
0 Comments