Type Here to Get Search Results !

जालन्यातील प्रसिद्ध योग प्रशिक्षक किशोर पांडे यांना योगरत्न पुरस्कार.


जालना/प्रतिनिधी : जालना येथील सुप्रसिद्ध योग प्रशिक्षक किशोर पांडेजी यांना नुकत्याच आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, ए.जी.एम ए, व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) डॉक्टर सेल आयुष विभाग वतीने  22 जून रविवार रोजी  अतिशय प्रतिष्ठेचा योगरत्न पुरस्कार मोठया थाटात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद )तेथे देण्यात आला.




या पुरस्काराला महाराष्ट्रातील योग शिक्षक, योग थेरपीस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांमध्ये शिक्षण सम्राट समजल्या जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ.बाळासाहेब पवार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून उपस्थित होते.सोबत पाहुण्यांमध्ये उद्योजक मनोज दांडगे,डॉ.नितीनराजे पाटील आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व्हाईस चेअरमन,डॉ.सतीश कराळे चेअरमन आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन,डॉ,बाबुराव कानडे अध्यक्ष-आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन,दिशा चव्हाण,प्रशांत सावंत, प्रा.कुणाल महाजन,मनोहर कानडे व इतर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. 




प्रतिक्रिया :-


किशोर पांडेजी यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्व स्तरावरून किशोर पांडेजी यांचे कौतुक व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.ते जालन्यातील भोकरदन येथील प्रसिद्ध योग प्रशिक्षक आहार, नाडी/ स्वर तज्ञ,थेरपीस्ट आहेत


गेल्या दहा वर्षापासून मी योगासन शिकवित असून कित्येक लोकांचं आरोग्य समृद्ध झाल्याचे मला समाधान आहे.ऍसिडिटी, मुळव्याध, थायरॉईड, कॅन्सर, स्किनचे आजार, सांध्यांचे आजार, पॅरालीसीस सारखे आजार बिना औषधोपचार खानपान राणीमान व योगाभ्यासाने निशुल्क पूर्णपणे बरे केले.यात योगाची भूमिका खूप महत्त्वाची आहे.


सर्वसामान्य योग साधकांना समजावे यासाठी या योग पद्धतीचे चार भागात वर्गीकरण केले  25% खानपान 25% राहणीमान 25% काढे 25% योगाभ्यास या गोष्टी मी त्यांना योगिक पद्धतीने शिकवितो. त्यांच्या बुद्धीत व शरीरात उतरवितो आणि यामुळे येणारा निकाल हा 25%+ 25%+ 25%+ 25% बरोबर 100% असतो रुग्णांचा निकाल येतो.तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्न हावभाव व सकारात्मक प्रतिक्रिया येतात हीच खरी योगगुरूंची कमाई आणि पुरस्कार आहे.पूर्वीपेक्षा योगा करण्याकडे लोकांचा भरपूर कल वाढला आहे.सध्या मी शहरासह ग्रामीण भागातही योग शिबिराच्या माध्यमातून लोकांना नैसर्गिक योगा शिकवितो.माझे स्वरज्ञान हेल्थ योगा नावाने भोकरदन येथे क्लासेस आहे मागील काही वर्षांपासून निस्वार्थ करत असलेल्या मेहनतीचे फळ मला आज योगरत्न पुरस्काराच्या  स्वरूपाने मिळाले.माझी या पुरस्कारासाठी निवड केली त्याबद्दल संयोजक आयोजक व सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद मानतो.

आपलाच...किशोर पांडे

Post a Comment

0 Comments