Type Here to Get Search Results !

सामाजिक कार्यकर्ते धोंडीबा दळवी यांना 'समाजरत्न' पुरस्कार जाहीर.

चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : चंदगड तालुक्यातील कळसगादे गावचे सुपुत्र व समाजसेवक धोंडीबा दळवी यांना "समाजरत्न  2025 पुरस्कार" श्री.पाणबुडी देवी कला मंच मुंबई यांच्यातर्फे जाहीर करण्यात आला आहे.धोंडीबा दळवी यांनी सामाजिक व दायित्व जपण्याच्या भावनेतून जी समाजसेवा केली आहे. त्याच कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 


या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन 15 जुलै रोजी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले येथे आयोजित केले आहे. दळवी हे गावातील धार्मिक कार्यात कायमच हिरीरीने भाग घेत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत व मार्गदर्शन करत असतात.गावातील पतसंस्थेचे चेअरमन पद सांभाळून अनेक गरिबांचे संसार उभा करण्यासाठी त्यांनी आपले योगदान दिले आहे. हा पुरस्कार मिळाल्याने दळवी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments