Type Here to Get Search Results !

योगतज्ञ श्वेता वैकुंठे यांना 'योगरत्न' पुरस्कार प्रदान.

पुणे प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : पुण्यातील विमान नगर परिसरातील सुप्रसिद्ध योग प्रशिक्षक,योग गुरू श्वेता प्रवीण वैकुंठे (थेरपॅटिक योग कन्सल्टंट)Founder -of BREATHiNG POiNT iNTEGRATiVE THERAPY'S Viman Nagar Pune Yoga, Naturopathy, Ayurveda Panchakarma Physiotherapy, Medical Yoga Therapy , Holistic healing Studio) यांना 22 जून रविवार रोजी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन,ए.जी.एम.ए, व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजितदादा पवार गट),डॉक्टर सेल आयुष विभाग वतीने अतिशय प्रतिष्ठेचा 'योगरत्न पुरस्कार' मोठया थाटात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद )येथे प्रदान करण्यात आला.


या पुरस्काराला महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून योगशिक्षक,योग थेरपीस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांमध्ये शिक्षण सम्राट समजल्या जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ.बाळासाहेब पवार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून उपस्थित होते.सोबत पाहुण्यांमध्ये उद्योजक मनोज दांडगे,डॉ.नितीनराजे पाटील आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व्हाईस चेअरमन,डॉ.सतीश कराळे चेअरमन आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन,डॉ,बाबुराव कानडे अध्यक्ष-आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन,दिशा चव्हाण,प्रशांत सावंत, प्रा.कुणाल महाजन,मनोहर कानडे व इतर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. 


योगदान:- 


श्वेता प्रवीण वैकुंठे यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरावरून सौ.श्वेता प्रवीण वैकुंठे यांचे कौतुक होत आहे.तसेच सर्व सोशल माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या जातं आहेत.


श्वेता वैकुंठे यांनी कुलगुरू कवी कालिदास नागपूर युनिव्हर्सिटी मधून योगशास्त्रामधून एम.ए डिग्री प्राप्त केली आहे.त्याचबरोबर त्या ऍडव्हान्स डिप्लोमा पावर योगा लेवल हे कोर्स देखील पूर्ण केले आहे.योग अभ्यासातील एकूण वीस वर्षाचा अनुभव त्यांना आहे.तसेच विविध महिलांना त्यांनी प्रशिक्षण देऊन आपले कार्य नावारूपाला आणले आहे. त्यामुळे एकंदरीत या सर्व बाबींचा विचार करून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

Post a Comment

0 Comments