Type Here to Get Search Results !

श्वेता देशपांडे यांना 'योगरत्न पुरस्कार' प्रदान.

पुणे/प्रतिनिधी : पुण्यातील खराडी येथील योग प्रशिक्षिका व आहारतज्ञ श्वेता अभिषेक देशपांडे यांना रविवार दि. 22 जून  रोजी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन,ए.जी.एम.ए व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवार गट )डॉक्टर सेल आयुष विभागाकडून अतिशय प्रतिष्ठेचा असा 'योग रत्न पुरस्कार' मोठ्या थाटात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे देण्यात आला. 


या पुरस्काराला महाराष्ट्रातील योग शिक्षक, योग थेरपीस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांमध्ये शिक्षण सम्राट समजल्या जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ.बाळासाहेब पवार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून उपस्थित होते.सोबत पाहुण्यांमध्ये उद्योजक मनोज दांडगे,डॉ.नितीनराजे पाटील आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व्हाईस चेअरमन,डॉ.सतीश कराळे चेअरमन आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन,डॉ,बाबुराव कानडे अध्यक्ष-आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन,दिशा चव्हाण,प्रशांत सावंत, प्रा.कुणाल महाजन,मनोहर कानडे व इतर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. 


योगदान:-


श्वेता देशपांडे  यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.श्वेता देशपांडे या उत्तम योग प्रशिक्षिका असुन त्या एक उत्तम आहारतज्ञ  आहेत.त्या लोकाना पोषणयुक्त आहार कसा असावा या बाबत सल्ला देन्याचे कार्य करतात. तसेच विविध मार्गदर्शन व शिबीर राबवून त्यांनी लोकांमध्ये जनजागृती केली आहे. एकंदरीत या सर्व कार्याचा आढावा घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Post a Comment

0 Comments