Type Here to Get Search Results !

चोरट्याकडून यशवंतनगर येथे चोरी.

चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : यशवंतनगर (ता.चंदगड) येथील बंद असलेल्या घराचा कडी कोयंडा उचकटून ३५ हजार रुपये लांबविल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञाता विरोधात चंदगड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी सुरेश पाटील हे आपल्या कुटुंबासह यशवंतनगर  येथे राहतात. ते आपल्या कुटुंबियासह पुण्याला गेले होते.


यावेळी पाळत ठेवून शनिवारी रात्री चोरट्यानी घराचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश करत लोखंडी कपाटातील ३५ हजार रुपये रक्कम लंपास केली.रविवारी सकाळी हा प्रकार शेजाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. यावेळी श्वान पथक व ठसे तज्ञांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.याप्रकरणी अज्ञाता विरोधात सूर्यकांत पाटील ( रा घुलेवाडी ) यांनी तक्रार दाखल केली आहे.

Post a Comment

0 Comments