चंदगड/प्रतिनिधी : जंगमहट्टी,धनगरवाडासह अन्य ठिकाणी मोठ्या उत्साहात मा.आमदार राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.कार्यसम्राट माजी आमदार राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांकडून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात.यंदाही असाच उपक्रम राबवून माजी. आमदार राजेश पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या उपक्रमांतर्गत निखिलदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके,पेन-पेंसिली आदी आवश्यक साहित्य देण्यात आले.हा उपक्रम हे केवळ साहित्यवाटप नव्हे,तर शिक्षणाची ज्योत पेटवत ठेवण्याचा एक समाजप्रेरित संकल्प होता.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि पालकांनी व्यक्त केलेली कृतज्ञता हाच या उपक्रमाचा खरा पुरस्कार ठरला.यावेळी मा.आमदार राजेश पाटील यांचे सुपुत्र निखिल पाटील,जंगमहट्टी सोसायटी चेअरमन संभाजी भोसले,एस. एन.पाटील,सुरज पाटील,प्रमोद पाटील,महेश पाटील,अक्षय पाटील तसेच आदि युवामंचचे आदी कार्यकर्ते,धनगरवाड्यातील ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments