Type Here to Get Search Results !

कावळेसाद दरीत कोसळलेल्या त्या पर्यटकाचा शोध आंबोली पोलिसांकडून सुरु.


चंदगड/प्रतिनिधी : आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी गेलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेतील एका कर्मचाऱ्याचां पाय घसरून तो ३०० फूट खोल कावळेसाद दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.मूळचे पन्हाळा तालुक्यातील माले इथले आणि सध्या रा. चिले कॉलनी इथं राहणारे राजेंद्र बाळासो सनगर हे त्यांच्या १४ सहकाऱ्यांसोबत आंबोली इथं वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेले होते. कावळेसाद पॉईंट येथे रोलिंगजवळ उभे असताना त्यांचा पाय अचानक घसरून ते दरीत कोसळले. गेळे गावचे सरपंच सागर ढोकरे यांनी या घटनेची माहिती दिली. 


सदर घटनेची माहिती मिळताच आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल मनीष शिंदे आणि इतर पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आंबोली रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. मात्र, रात्रीचा काळोख आणि दाट धुक्यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत.काळोख आणि दाट धुक्यामुळे शुक्रवारी सायंकाळी शोध मोहीम राबवणे शक्य नसल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे.त्यामुळे राजेंद्र सनगर यांच्या शोध मोहिमेला शनिवार सकाळपासून सुरुवात करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.


वर्षा पर्यटनासाठी जाताय?


वर्षा पर्यटनासाठी दरवर्षी पर्यटक जात असताना अनेक दुर्घटना घडल्या जातात,त्यामध्ये कित्येक लोकांचा बळी जातो.या प्रत्येक दुर्घटनेचा फटका त्या-त्या कुटुंबियांना बसत असतो. त्यामुळे नेहमी वर्षा पर्यटनासाठी जाताना स्वतःची व इतरांची काळजी घ्या,सावधानता बाळगा,अनुचित व समाजविघातक कृत्य करू नका,व्यसना पासून दूर रहा व वर्षा पर्यटनाचा आनंद घ्या!

Post a Comment

0 Comments