Type Here to Get Search Results !

छ.शिवाजी महाराज महाराजस्व अभियान कोवाड येथे संपन्न.

चंदगड/प्रतिनिधी : तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कोवाड येथे महाराजस्व समाधान शिबिर पार पडले.यावेळी आमदार शिवाजी पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.या शिबिरामध्ये ग्रामस्थांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला.शासन आपल्या दारी ही प्रशासनाची योजना सर्वांसाठी लाभदायक ठरत असून ही योजना प्रभावीपणे राबविल्याबद्दल तहसीलदार राजेश चव्हाण व सर्व विभागातील शासकीय कर्मचारी व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन आमदार पाटील यांनी केले.



चंदगड मतदारसंघांमध्ये ग्रामीण भाग जास्त असल्याने लोकांना समजावून घेऊन शासकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याची सूचना आमदार पाटील यांनी केले. यावेळी माजी मंत्री भरमुअण्णा पाटील, सरपंच अनिता भोगण, कल्लाप्पा भोगण, वाय. बी. पाटील, एम.जे. पाटील, अशोकराव देसाई, भावकू गुरव, जुबेर काझी, वनक्षेत्रपाल शितल पाटील यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. मंडळ अधिकारी शरद मगदूम यांनी आभार मानले.




मंडळ अधिकारी शरद मगदूम यांनी आपल्या शासकीय माध्यमातून कित्येक वर्षे जनतेची सेवा करत उत्कृष्ट अधिकारी कसा असावा? हे त्यांनी कामातून दाखून दिले.लोकांचे प्रलंबीत विषय मार्गी लावणे,दाखले तात्काळ काढणे,कर्मचाऱ्यांकडून शिस्तप्रिय पद्धतीने काम करून घेणे. या आदी कार्यामुळे ते चंदगड प्रशासनात परिचित आहेत.


Post a Comment

0 Comments