Type Here to Get Search Results !

योगशिक्षिका राजश्री कुंभार यांना योगरत्न पुरस्काराने सन्मान!

चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : माणगाव (ता.चंदगड)येथील योगशिक्षिका राजश्री आप्पासाहेब कुंभार यांना छत्रपती संभाजीनगर येथे योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.गेली 20 वर्षे कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता महिला, कॉलेज विद्यार्थिनी व शाळेतील मुलांसाठी मोफत योगासनाचे क्लास घेऊन निरोगी भारत घडवण्याच्या त्या उत्कृष्ट मानकरी ठरल्या.अत्यंत संयमी व निरागस मनाने त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले.


आजच्या ढगधगत्या जीवनात माणुसकीची जाणीव ठेवून आपण समाजाला देण लागतो, या हेतूने निस्वार्थी सेवा करतात.एकंदरीत त्यांचं हे कार्य पाहून महिलामध्ये उत्कृष्ठ योगरत्न महिला म्हणून ओळख निर्माण झाली आहे.अत्यंत मेहनत घेणाऱ्या राजश्री कुंभार यांना आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट ) डॉक्टर सेल आयुष्य विभागाच्या वतीने जागतिक योग दिननिमित्त रविवार दिनांक 22 जून रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह छत्रपती संभाजीनगर येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार बहाल करण्यात आला.


या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्यातील योगशिक्षक,योगाचार्य, योगतज्ञ,योग थेरपिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक मनोज दांडगे यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व उदघाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब पवार होते.डॉक्टर नितीन राजे पाटील,आयुष्य इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व्हाईस चेअरमन  तथा राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल प्रदेश कार्याध्यक्ष(आयुष विभाग )डॉ. सतीश कराळे,डॉ. बाबुराव कानडे,दिशा चव्हाण, प्रशांत सावंत, प्राध्यापक कुणाल  महाजन, मनोहर कानडे यांच्यासह आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. हा  मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल  राजश्री कुंभार यांच्यावर सर्व स्तरावरून कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments