कोल्हापूर/प्रतिनिधी : वृंदा सामाजिक फौंडेशन इचलकरंजी यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या ६४ तृतीय पंथी यांचा गौरव पुरस्कार सोहळा हातकणंगले येथील रघु-जानकी हॉल येथे संपन्न झाला.या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.माहिती अधिकार पत्रकार महासंघ आणि वृंदा सामाजिक संस्था यांच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त तृतीयपंथी समाजातील गुरुवर्य आणि समाजामध्ये आपल्या वेगवेगळ्या कार्यामध्ये कार्यकर्तृत्व केलेल्या व्यक्तींचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
आज तृतीयपंथी समाजाला पुरस्कार मिळाला.मानसन्मान मिळाला,टाळ्याही मिळाल्या,पण हे सर्व मिळत असताना या समाजाला प्रगतीपथावर जातं असताना समाजाकडून तिरस्कार,हाल,हिन दर्जाची वागणूक,नकारात्मकता या सर्व गोष्टी सहन करत आज तृतीयपंथी समाज नवीन बदल घडवून समाजाला दिशा देणारा ठरतोय.
या कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षांच्या भाषणाने करण्यात आली.यावेळी शैक्षणिक कला आणि साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमठवणाऱ्या ६४ तृतीय पंथ्यांचा गौरव करण्यात आला.या गौरव समारंभाला कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, पुणे येथील तृतीय पंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार अक्षरा टिवले यांनी मानले.यावेळी राज्य मंडळाच्या विभागीय सदस्या मयुरी आळवेकर,अक्षरा टिवले,सुहासिनी आळवेकर या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.
Post a Comment
0 Comments