कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय विद्यालयाचे प्राचार्य एम एस देशमुख यांनी केले.त्यानंतर कार्यक्रमात फेब्रुवारी - मार्च 2025 मधील एस एस सी, एच एस सी तसेच एन एम एम एस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत प्रत्येकी एक मनगटी घड्याळ व रोख बक्षीस तसेच डिडवानिया चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्यामार्फत विशेष बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षीसासाठी ज्या दानशूर व्यक्तींनी ठेव ठेवलेली आहे अशा सर्व उपस्थित ठेवीदारांचाही सत्कार संस्थेचे अध्यक्ष ए व्ही रेडेकर यांच्याहस्ते करण्यात आला.कार्यक्रमात ए व्ही रेडेकर , संतु दावणे, कैलासजी डिडवानिया, तसेच सुहास नाडगौडा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष सुभाष दावणे, उत्तम नाईक, ग्रामपंचायत सदस्य नारायण कोकितकर, बी. वाय.देसाई , सुरेश दावणे, एम. ए. पाटील, दशरथ दावणे, कृष्णा दळवी, विजय गुरव अर्जुन दावणे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सर्व सदस्य तसेच माजी सैनिक संघटनेचे सदस्य,विविध संस्थांचे पदाधिकारी , विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री भावेश्वरी चारिटेबल ट्रस्ट कडून भागातील असाह्य विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक खर्चासाठी दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचे धनादेश श्री.कावीलकर ,वसंत करंबळकर व सुहास नाडगौडा यांच्याहस्ते विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप वाळवे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा. शिवाजी आंबुलकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व अध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment
0 Comments