Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलर हायमास्ट दिव्यांचा लोकार्पण सोहळा.


गडहिंग्लज/प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खमलेहट्टी व औरनाळ येथे सोलर हायमास्ट दिव्यांचा लोकार्पण सोहळा माजी आमदार राजेश पाटील यांच्याहस्ते पार पडला.

चंदगड विधानसभा मतदारसंघाचे मा.आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजना अंतर्गत औरनाळ ता.गडहिंग्लज येथे ४.४१ लाख रुपयांचा निधी तर खमलेहट्टी येथे ४.४१ लाख रुपयांच्या निधी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या हायमास्ट दिव्यासाठी मंजूर करण्यात आला होता.गावाच्या सुरक्षिततेसह सार्वजनिक ठिकाणी प्रकाश व्यवस्था सक्षम व्हावी या हेतूने हा सौर हायमास्ट दिवा उभारण्यात आला आहे. या दिव्यामुळे गावातील नागरिकांना रात्रीच्या वेळी सुरक्षित आणि उजळ वातावरण मिळणार असून, ऊर्जा बचतीसह पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्यात आली आहे."अजितदादांच्या विकासदृष्टिकोनातून प्रेरणा घेत आम्हीही ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडवतो आहोत," असे आमदार राजेश पाटील यांनी कार्यक्रमामध्ये सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयसिंगराव चव्हाण,बाजार समितीचे अध्यक्ष अभयदादा देसाई,लक्ष्मण तोडकर, तानाजीराव भोसले, प्रवीण शिंदे, सरपंच संदीप पाटील,शंकर सुतार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य,अजितदादा राष्ट्रवादी गटाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments