Type Here to Get Search Results !

राज्य गुणवंत कामगार असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.


(कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य सोहळा)


चंदगड/प्रतिनिधी : राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात राज्यस्तरीय "कामगार भूषण पुरस्कार" कोल्हापूरचे सुपुत्र आणि मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर तुकाराम कांबळे यांना प्रदान करण्यात आला.त्याचबरोबर राज्यस्तरीय "सहकार भूषण पुरस्कार" सम्यक वैद्यकीय व शिक्षण चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सहदेव जाधव, सहकार क्षेत्रातील जाणते तज्ञ तुळशीदास सन्नके, व दिपक शिंगरे यांना प्रदान करण्यात आला.


या पुरस्कारांचे वितरण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व माजी गृहमंत्री आ.सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याहस्ते शाल, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. कार्यक्रमात राजयोगिनी ब्रह्माकुमारी सुनंदा दीदी, श्रमिक शिक्षण एज्युकेशन बोर्डचे चेअरमन डॉ. रविकांत पाटील, सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके, कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे, निर्मिती विकास मंचचे अध्यक्ष अनिल महामने आणि राज्य सचिव अच्युतराव माने यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर होते.यावेळी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांचा राज्य व राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.यामध्ये मुंबईतील गुणवंत कामगार बाळकृष्ण तावडे, राजेंद्र कांबळे, संजय तावडे, केरबा डावरे, प्रसन्न पारकर, दत्तात्रय शिरोडकर, भरत सकपाळ, संपत तावरे, अनिल तावडे आदी मान्यवरांचा समावेश आहे.पुरस्कारप्राप्त गुणवंत प्रभाकर कांबळे यांनी सांगितले की, हा सन्मान केवळ वैयक्तिक नाही तर संपूर्ण श्रमिक व सहकारी क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे.







Post a Comment

0 Comments