(शेतकरी कर्जमाफी, पेन्शन योजना व नुकसानभरपाईच्या मागण्यांसाठी आंदोलन,बेळगांव-वेंगुर्ला रस्ता दुरुस्तीसाठीही शासनाकडे लक्ष वेधले-छ.संभाजी महाराज चौक ते तहसिल कार्यालय, चंदगड दरम्यान मोर्चा काढून निवेदन सादर)
चंदगड/प्रतिनिधी : राज्यात सत्तेवर असलेल्या महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने चंदगड येथे "भिक मांगो आंदोलन" करण्यात आले.शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांग व निराधार पेन्शन, अतिवृष्टी नुकसान भरपाई, बहिणींची मदत रक्कम, तसेच अत्यंत धोकादायक अवस्थेतील बेळगांव-वेंगुर्ला राज्यमार्गाचे नूतनीकरण या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन झाले.शासनाकडे निधीच उपलब्ध नसल्यामुळे या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शिवसेनेने छत्रपती संभाजी महाराज चौक ते तहसिल कार्यालय चंदगडपर्यंत भिक मांगो आंदोलन राबविले.
तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करत शासनाच्या उदासीन धोरणाचा निषेध करण्यात आला.यावेळी तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले.या आंदोलनात जिल्हाप्रमुख प्रा.सुनिल शिंत्रे,उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील,जिल्हा महिला संघटक सौ. शांता जाधव,ऍड.स्नेहल पाटील,विष्णू गावडे (ता.प्रमुख गडहिंग्लज),दिलीप माने (ता.प्रमुख गडहिंग्लज),युवराज पवार (ता.प्रमुख आजरा),विक्रम मुतकेकर (तालुका संघटक),महेश पाटील (वाहतूक सेना ता.प्रमुख),गणेश बागडी (तालुका युवा अधिकारी),किरण नागुर्डेकर (युवासेना),एकनाथ वाके (विभाग प्रमुख),मोसिन पटेकरी (शहर प्रमुख),महादेव गुरव, उदय मंडलिक, भरमू बिर्जे, सुशिल दळवी, देवाप्पा सदावर, सुभाष लांबोर, अशोक दळवी, चंद्रकांत गावडे, सुज्ञान धुपदाळे, रेखा सुतार, मधुरा कांबळे, कांचन सुतार तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अधिकृत संघटनांचे पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आंदोलनस्थळी प्रा. सुनिल शिंत्रे, युवराज पवार, विष्णू गावडे, महेश पाटील, विक्रम मुतकेकर यांनी शासनाच्या धोरणावर टीका करत आपली मनोगते व्यक्त केली.
Post a Comment
0 Comments