चंदगड/प्रतिनिधी : मांडेदुर्ग येथील पै. रामचंद्र मारुती पवार यांची अथेन्स (ग्रीस) येथे होणाऱ्या १७ वर्षाखालील जागतिक महिला कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय महिला कुस्ती संघाचे मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.ही स्पर्धा जागतिक कुस्ती संघटनेच्या (UWW) वतीने २८ जुलै ते ३ ऑगस्ट २०२५ दरम्यान होणार आहे.पै. पवार यांनी यापूर्वीही युथ ऑलिम्पिक, आशियाई कुस्ती स्पर्धा आणि जागतिक स्पर्धांमध्ये भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून यशस्वी योगदान दिले आहे.सध्या ते भारतीय सेनेमध्ये वरिष्ठ कुस्ती प्रशिक्षक म्हणून कार्यरत असून, नुकतीच स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) तर्फे टॅलेंट आयडेंटिफिकेशन डेव्हलपमेंट कमिटीमध्ये त्यांची प्रख्यात कोच म्हणून निवड झाली आहे.
या स्पर्धेसाठी ते १० महिला कुस्तीपटूंना विविध वजनगटांमध्ये घेऊन २७ जुलै रोजी नवी दिल्लीहून अथेन्सकडे रवाना झाले आहेत.त्यांच्यासोबत सहकारी प्रशिक्षक म्हणून समीक्षा (हरियाणा), सिकंदर (भारतीय रेल्वे) आणि फिजिओ म्हणून लतिका (मध्य प्रदेश) यांचाही सहभाग आहे.त्यांच्या या निवडीबद्दल संपूर्ण कुस्ती क्षेत्रातून, महाराष्ट्र आणि देशभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.सीमावर्ती चंदगडमधील एका ग्रामीण भागातील व्यक्तीने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नेतृत्व करणे हे तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Post a Comment
0 Comments