Type Here to Get Search Results !

आजऱ्यात 18 ऑगस्ट रोजी शक्तीपीठ महामार्ग विरोधात मोर्चा.


आजरा/प्रतिनिधी : शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यावर लादलेला असून आम्ही हा मार्ग कदापी होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा आजऱ्यातील शेतकऱ्यांनी घेतला.शेतकऱ्यांना व पर्यावरणाला उध्वस्त करणारा हा शक्तीपीठ समाजाला घातक असल्याने या विभागातील शेतकऱ्यांचा विरोध दर्शवण्यासाठी सोमवार दि. 18 ऑगस्ट रोजी आजरा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला.या पार पडलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आजरा साखर कारखाना अध्यक्ष मुकुंददादा देसाई होते.


संघर्ष समितीचे निमंत्रक आणि श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई,बळीराजा संघटनेचे नितीन पाटील,शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्यांनवर,शिवसेनेचे युवराज पोवार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.तसेच तानाजी देसाई, उमेश आपटे, दशरथ घुरे, शांताराम पाटील, नागेश चौगुले, बाळू पाटील, गोविंद पाटील, शिवाजी गुरव, शिवाजी इंगळे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.सुरवातीला अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी विद्याधर गुरबे, अल्बर्ट डिसोझा, रवी भाटले, रामदास पाटील, संजय तरडेकर, प्रकाश शेटगे, किरण पाटील, नारायण भडांगे, संभाजी सांबरेकर, विष्णू पाटील यांच्यासह दाभिल, शेळप, घाटकरवाडी, पारपोली, जेऊर, चितळे, भावेवाडी येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments