Type Here to Get Search Results !

आजचे विद्यार्थी हे देशाचे आधारस्तंभ आहेत-प्राचार्य आर.पी.पाटील



(नरसिंगराव भुजंगराव पाटील ज्युनिअर कॉलेज चंदगड येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी)


चंदगड/प्रतिनिधी : आजचे विद्यार्थी हे देशाचे आधारस्तंभ आहेत. त्यांचे जीवन सुखी आणि समृद्ध व्हायचे असेल तर महामानवांचे विचार आत्मसात केले पाहिजेत. यासाठी विद्यार्थ्यांनी अहोरात्र वाचन केले पाहिजे. कारण वाचनाने माणसाचे मस्तक सुधारते व सुधारलेले मस्तक कोणापुढेही नतमस्तक होत नाही याचे भान विद्यार्थ्यांनी ठेवावे असे मत प्राचार्य आर.पी.पाटील यांनी व्यक्त केले. ते नरसिंगराव भुजंगराव पाटील ज्युनिअर कॉलेज चंदगड येथे आयोजित केलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अशा संयुक्त कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. 




प्रारंभी लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्याच्या हस्ते करण्यात आले.प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. बाबासाहेब शिंगाडे यांनी करून लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा विद्यार्थ्यांसमोर मांडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ प्रा.सलीम शेख उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना प्राचार्य आर.पी.पाटील म्हणाले की, कॉलेज जीवनातच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असतो म्हणून विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये राबवत असलेल्या सर्व उपक्रमात हिरीरीने भाग घेऊन स्वतःचे व्यक्तिमत्व घडवावे असे आवाहन केले. या संयुक्त कार्यक्रमानिमित्त भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेवून उज्वल यश संपादन केले. यावेळी परीक्षक म्हणून प्रा.दीपक कांबळे व  प्रा.शोभा पाटील यांनी काम पाहिले.सूत्रसंचालन प्रा.अर्चना रेळेकर यांनी केले.या कार्यक्रमाला प्रा.अशोक नांदवडेकर,प्रा.विक्रम बोकडे,प्रा.एकनाथ पाटील, सुधाकर गणपते यांच्यासह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments