Type Here to Get Search Results !

राज्यातील 1800 भजनी मंडळांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचे अनुदान मिळणार



चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यावर्षीपासून गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून साजरा होणार असून या उपक्रमांतर्गत राज्यातील 1800 भजनी मंडळांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात येणार आहे. 



या अनुदानाचे अर्ज दि. 23 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान https://mahaanudan.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून चंदगड व आजरा तालुक्यातील भजनी मंडळाचे ऑनलाईन अर्ज भारतीय जनता पक्ष कार्यालय इनाम सावर्डे येथे मोफत भरले जाणार आहेत तर गडहिंग्लज तालुक्यातील भजनी मंडळांनी  9552840126 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पक्ष कार्यालयाने  केले आहे.

Post a Comment

0 Comments