चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : हॉकी लीजेंड पद्मभूषण मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार समिती आणि काली रमण फाउंडेशन इंडिया यांच्यामार्फत दिला जाणारा मानाचा मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार २०२५ कोल्हापूर येथील पत्रकार उत्तम पाटील यांना जाहीर झाला आहे.
दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे आयोजित्य साधून संपूर्ण देशात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उत्तम पाटील यांना यंदाचा हा पुरस्कार जाहीर झाला असून २९ ऑगस्ट रोजी दसरा चौक कोल्हापूर येथील छत्रपती राजश्री शाहू स्मारक हॉलमध्ये हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. पुरस्कार विजेते उत्तम पाटील हे एस न्यूज चे पत्रकार असून त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
"एखादा पुरस्कार मिळणे म्हणजे त्या पाठीमागे खूप कष्ट असतात.गेली दहा वर्षे आम्ही क्रीडा क्षेत्रात काम करून खेळांडू, पालक आणि प्रशिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.त्याचीच दखल घेत हा सन्मान मला मिळणार आहे.पण माझ्या सन्मानापेक्षाही सर्वसामान्य लोकांच्यासाठी केलेल्या कामातून मिळालेलं समाधान खूप वेगळं असत.आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे.मी आपल्या कार्यात नेहमी कटीबद्ध राहून अशीच जबाबदारी पुढील काळातही पार पाडेन" अशी प्रतिक्रिया यावेळी पत्रकार उत्तम पाटील यांनी महाराष्ट्र माझा 24 ला दिली.
Post a Comment
0 Comments