उत्तूर/प्रतिनिधी : श्री.गुंडू शाहीर कला क्रीडा व सांस्कृतिक मंच आरळगुंडी यांची ग्रामीण भागातील लोप पावत चाललेली शाहिरी कला हनुमंताचा जागर श्रावणी महोत्सव परंपरा गेली 25 वर्षे अविरतपणे सुरु करण्यात आली आहे. यामध्ये नवोदित कलाकाराना व्यासपीठ मिळवून देणारे व लोकशाहीर द.ना. गव्हाणकर यांच्या कार्याला उजाळा देणारे शाहीर म्हूणन ख्याती असलेलं शाहीर गुंडू राजाराम यांच्याकडून श्रावण मासनिमित्त हनुमंताचा जागर शाहिरी महोत्सव पारितोषिक वितरणसोहळा उत्साहात पार पाडण्यात आला.
यावेळी भुदरगड,कागल,राधानगरीसह उत्तूर भागातील कलाकारांनी कार्यक्रमास मोठया हिरीरीने सहभाग नोंदविला.प्रास्ताविक अध्यक्ष विठ्ठल कदम यांनी करून कलाकारना माहिती सांगितली.तर पारितोषिक वितरण डॉ सचिन पोवार,कलाकार मानधन कमेटी सदस्य राजू कोपटकर,लोकशाहीर द. ना. गव्हाणकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष भैरू सावंत,सुजित लोखंडे,कार्याधक्ष गणपती नागरपोळे,ऍड सुशांत पोवार यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी शाहीर रामदास सातपुते, संजय इंगळे,कुणकेकर, परशुराम उतूरकर, पांडुरंग येजरे, पिंटू चौगुले, दत्ता पाटील, दत्ता रेडेकर यांच्यासह महिला कलाकार मालू सुतार, गीता करडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन श्रीपाल कांबळे यांनी तर आभार ढोलकी पटू बयाजी ससाने यांनी मानले.
Post a Comment
0 Comments