Type Here to Get Search Results !

गणेश चतुर्थी निमित्त किणी येथे विविध स्पर्धाचे आयोजन.

 


चंदगड प्रतिनिधी / रुपेश मऱ्यापगोळ :  किणी (ता.चंदगड ) येथील जय कलमेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून विविध स्पर्धांच्या आयोजन केले आहे.


 गुरुवार दिनांक 29 रोजी  भव्य खुल्या संस्कार भारती रांगोळी स्पर्धा, सोमवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी भव्य खुला रेकॉर्ड डान्स, बुधवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी पाचवी ते नववी मुलांसाठी निबंध स्पर्धा, गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी इयत्ता सातवी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा तर चौथी ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित केले असून या सर्व स्पर्धेसाठी भरवस बक्षीसे व चषक देण्यात येणार असून स्पर्धकांनी अधिकच्या माहितीसाठी  संजय कुट्रे मो. 9420459379 संभाजी हुंदळेवाडकर -  7083105848 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments