चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील कसाई समाजाने गाई-बैलांच्या अवैध कत्तलीसाठी तहसीलदार कार्यालयाकडे अर्ज दिल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रात गोवंश हत्या विरोधी कायदा कठोरपणे लागू असूनही अशा प्रकारे खुलेआम अर्ज दाखल होणे ही कायद्याला व समाजाच्या श्रद्धांना उघडपणे दिलेली आव्हानात्मक धमकी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज व विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तहसीलदारांना निवेदन देऊन अवैध कत्तल रोखण्यासाठी तातडीने कारवाईची मागणी केली. ७ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या या निवेदनात “गाई-म्हशी हे भारतीय संस्कृतीचे प्राण आहेत, गोमाता ही आपल्या श्रद्धेचे व जीवनमूल्यांचे प्रतीक आहे. छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गोरक्षणासाठी कटिबद्ध राहणे हेच आजचे कर्तव्य आहे. अशा परिस्थितीत कसाई समाजाकडून दिलेला अर्ज हा कायद्यालाही व समाजालाही चिथावणी देणारा आहे. त्यामुळे संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी,” असे स्पष्ट नमूद करण्यात आले.
निवेदन देताना सकल हिंदू समाज चंदगड तालुका, हिंदुराष्ट्र सेना, श्रीराम सेना, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, विश्व हिंदू परिषद-बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू जनजागृती समिती या संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी उपस्थितांमध्ये महांतेश देसाई (हिंदुराष्ट्र सेना श्रीराम सेना चंदगड अध्यक्ष), तुकाराम मरगाळे, अनिकेत सावंत (शिव प्रतिष्ठान), तेजस गावडे, नारायण दळवी, दयानंद पाटील, अनिकेत घाटगे, संतोष शिंदे, ओमकार सुळेभावकर, पंकज दळवी, अमेय सबनीस (भाजप चंदगड शहर), बाबू नेसरकर (शिवसेना शिंदे गट), किरण कोकीतकर (शिवसेना चंदगड प्रमुख), सुनील दळवी (शिवसेना), संदीप नाडगोंडा (बजरंग दल) यांचा विशेष सहभाग होता.या प्रकरणामुळे चंदगड तालुक्यात तीव्र असंतोष निर्माण झाला असून शासनाने तातडीने पावले न उचलल्यास व्यापक आंदोलनाचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.गोरक्षणासाठी झटणाऱ्या संघटनांच्या या ठाम भूमिकेमुळे आता प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment
0 Comments