चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील कळसगादे गावचे सुपुत्र व समाजसेवक धोंडिबा दळवी यांना श्री पाणबुडी देवी कलामंच मुबंई यांच्या मार्फत " समाजरत्न 2025" हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.दळवी यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, गरजूना आर्थिक मदत, धार्मिक कार्यात असलेला सहभाग या सर्व कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विर्लेपार्ले येथे देण्यात आला.यावेळी त्यांचे कुटूंबीय, मित्रमंडळी उपस्थित होते.
धोंडीबा दळवी हे गावातील धार्मिक कार्यात कायमच हिरीरीने भाग घेत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत व मार्गदर्शन करत असतात.गावातील पतसंस्थेचे चेअरमन पद सांभाळून अनेक गरिबांचे संसार उभा करण्यासाठी त्यांनी आपले योगदान दिले आहे.एकंदरीत हा पुरस्कार मिळाल्याने दळवी यांच्यावर सर्व क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Post a Comment
0 Comments