चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील पश्चिम भागामध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व प्रांत ग्राहक संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गावडे यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या स्वरूपात साजरा करण्यात आला.आपण समाजाला काय देणे लागतो हा उदात्त हेतू ठेवून नेहमी लोकांना सहकार्य करणारे गावडे यांनी पुन्हा एकदा माणुसकीचा प्रत्येक लोकांसमोर आणला आहे.
समाजसेवक चंद्रकांत गावडे यांनी जेष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत अनेक विषय मार्गी लावले आहेत.मागील काही वर्षात त्यांनी दिशादर्शक फलक,विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,गरजू लोकांना आर्थिक सहकार्य तसेच वृक्षारोपण करून समाजाला एक आदर्श घालून दिला आहे.तर यावर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी उमगाव येथे आरोग्य शिबिर राबवून नागरिकांना त्यांच्या आजारावर मिळणाऱ्या औषध गोळ्या वाटप करून हा वाढदिवस साजरा केला.यावेळी त्यांचे सहकारी,प्रांत ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाकार्याध्यक्ष राजेद्र किरमटे,इम्मानुएल पिंटो,डॉ.प्रकाश पाटील,सुर्यकांत गावडे,पांडुरग गावडे,ईश्वर गावडे,उमाजी देवळी,औदुबर देवणे,जाणवी अमृसकर,लक्ष्मी गावडे,यशोदा सावंत यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments