चंदगड/प्रतिनिधी : अतिपाऊस झाल्यामुळे नदीला पूर आला.नदीचे पाणी जॅकवेलमध्ये शिरल्याने सुरुते येथे नळावाटे दूषित पाणी सोडण्यात येत होते.त्यामुळे पाणीपुरवठ्याचे अधिकारी पंचायत समिती चंदगड यांना बोलावून दूषित पाणी न येण्यासाठी उपाय योजना करण्यासाठी महाराष्ट्र माझा 24 लाईव्ह न्यूजचे उपसंपादक भरमु शिंदे व संविधान ग्रुप शाखाप्रमुख सचिन मंतेर यांच्या मागणीनुसार बोलवण्यात आले होते.त्यांनी स्थानिक ठिकाणी येऊन पाहणी केली व त्या पद्धतीची उपाययोजना करण्याचे आदेश दिले.तसेच ज्याला घरकुल चा लाभ मिळाला नाही ज्यांचे कच्चे घर आहे अशा लोकांचा सर्वे करण्याची सुद्धा मागणी करण्यात आली होती.
ज्यांना खरोखरच लाभ मिळायचा आहे त्याला लाभ मिळावा याकरिता पारदर्शक सर्वे करण्याकरिता भरमु शिंदे यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन पुन्हा सर्वे करण्याची मागणी केली होती.त्याप्रमाणे अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत सुरूते ग्रामसेवक यांनी तातडीने सर्वे करून प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला.
Post a Comment
0 Comments