Type Here to Get Search Results !

सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मनवाडकर यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप.



 (तेऊरवाडी येथे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वह्यांचे वाटप,शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणविषयी प्रेरणा निर्माण करणारा उपक्रम)


चंदगड/प्रतिनिधी : चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एक स्तुत्य उपक्रम तेऊरवाडी येथील मराठी शाळा येथे पार पडला. सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मनवाडकर यांच्या पुढाकारातून शाळेतील लहान विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्सुकता आणि प्रेरणा निर्माण केली. "शिक्षण हा मुलांचा हक्क असून त्यासाठी समाजाने एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे," असे मत काही मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.


कार्यक्रमाच्या सुरूवातीस शाळेतील अध्यापक मनवाडकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी कल्लाप्पा कांबळे, सौ.पाटीलताई, माजी सैनिक गजानन पाटील, लक्ष्मण यादव, विनोद पाटील, रविंद्र रामचंद्र पाटील, राम मनवाडकर, मारुती कांबळे, रवी पाटील, सुधीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.सामाजिक भान ठेवून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध माध्यमांतून मदतीचा हात पुढे करण्याची गरज लक्ष्मण मनवाडकर यांनी आपल्या मनोगतात मांडली. विद्यार्थ्यांमध्येही या उपक्रमामुळे समाधान व आनंद दिसून आला.


या उपक्रमातून आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श घालून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाढदिवसानिमित्त केक न कापता, विद्यार्थ्यांच्या हातात वह्या देण्याचा निर्णय समाजप्रबोधन करणारा ठरला.

Post a Comment

0 Comments