चंदगड/प्रतिनिधी : शाळेच्या प्रांगणात गावातील ज्येष्ठ नागरिक श्रीमती सरस्वती दत्तात्रय पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.यावेळी दहावी बोर्ड मार्च 2025 परीक्षेमध्ये उत्तीर्ण खालील यशवंत विद्यार्थ्यांना शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर वैजू नागो कलखांमकर यांच्या आईच्या स्मरणात बक्षीसे देऊन गौरवण्यात आले.तसेच कुमार अतुल नामदेव ओऊळकर हा N.M.M.S परीक्षेमध्ये तालुक्यात द्वितीय, जिल्ह्यात २८ व स्कॉलरशिप धारक विद्यार्थ्यांचा सुद्धा रोख रक्कम सन्मान चिन्ह व संस्थेचे सर्प माहिती पुस्तिका देऊन गौरवण्यात आले.
यावेळी गावचे विद्यमान सरपंच सुस्मिता संजय पाटील,ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सेवा सोसायटी चेअरमन गावडू हनुमंत पाटील, व्हा.चेअरमन प्रकाश भोगुलकर,पोलीस-पाटील राजेंद्र पाटील, माजी शिक्षण विस्तार अधिकारी विलास कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष तानाजी टक्केकर, उपाध्यक्ष के. टी. पाटील, मा.संचालिका श्रीमती शांता बाबुराव टक्केकर, माजी सैनिक, शाळेचे आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, शाळेचे प्राचार्य एन जी यळ्ळूरकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यशवंत विद्यार्थी-
प्रथम क्रमांक:- कु.श्रावणी सदाशिव पाटील
द्वितीय क्रमांक:- कु.अक्षरा बाबुराव कदम
तृतीय क्रमांक:- कु.प्रांजल बाबुराव पाटील
Post a Comment
0 Comments